पणजी | गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांशी निवडणूकपूर्व युतीची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे गोवा विधानसभेतील एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेसकडे निवडणूकपूर्व युती करायची झाल्यास 20 पेक्षा कमी जागा पक्षाने मान्यच करू नये,अशी मागणी पटेल यांच्याकडे केलीये.
भाजपच्या पराभवाचे उद्दिष्ट ठेवून विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादी सध्याच गोव्यात सात ते आठ जागा स्वबळावर लढवू शकतं, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
गोव्यात राष्ट्रवादीचे काम आणखी वाढविले जाईल. मी प्रभारी म्हणून स्वतः तसेच महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचा किमान एक ज्येष्ठ मंत्री महिन्याला एकदा तरी गोव्यात येईल आणि येथील पक्षाच्या कामाचा आढावा घेईल, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल.
महत्वाच्या बातम्या-
आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं?- चंद्रकांत पाटील
शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू
“देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही”
‘मी सगळं सुरू करतो, काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?’; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे