बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपल्या हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा- विजय वडेट्टीवार

मुंबई | संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई सुरू झाली आहे. आता आपल्या न्याय्य हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा, असं आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते अलिबाग येथे बोलत होते.

ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्व समाजांनी आपले स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी राजकारण्यांनी ओबीसी समाजाचा वापर केला, असा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य मिळवून दिले. संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

अठरा पगड जातींचा समूह ओबीसीमध्ये मोडतो. त्यांचे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ओबीसी समाजाने संघटित व्हायला हवं, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ तारखेपासून विद्यापीठ, कॉलेज सुरु करा; यूजीसीकडून गाईडलाईन्स जारी

“6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, केंद्राचं महागाई वाढवण्याचं धोरण”

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट; भेटीनंतर म्हणाले…

भारत आणि पाकिस्तान टी20 विश्वचषकात भिडणार; सामन्याबाबत मोठी माहिती समोर

भाजप आणि आरएसएसला घाबरणाऱ्यांची आम्हाला गरज नाही, त्यांनी काँग्रेस सोडून जावं- राहुल गांधी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More