बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘या’ महिन्यात दोन लाख आयसीयु बेड तयार ठेवा”

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. नागरिक आणि प्रशासनाच्या गाफील राहण्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता दुसरी लाट ओसरत चालली असली तरी संभाव्या तिसऱ्या लाटेचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला असून इतरही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अशातच नीती आयोगाने सप्टेंबर महिन्यात 2 लाख आयसीसीयू बेड तयार ठेवण्यास सांगितले आहेत.

कठिण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज रहावं लागेल. पुढील काही दिवसात दिवसाला 4 ते 5 लाख कोरोना रूग्ण येण्याचा अंदाज आहे. त्यासाठी आपण दोन लाख आयसीयु बेड तयार करून ठेवले आहेत. यामध्ये व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयु बेड, 7 लाख नॉन- आयसीयु हॉस्पिटल बेड आणि 10 लाख कोवीड आयसोलेशन बेड असावेत अशा सुचना नीती आयोगाने सरकारला दिल्या आहेत.

मागील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज बांधला होता. तो अंदाज आता अधिक धोकादायक जात असल्याचं चित्र दिसत आहे. कोरोनाची गंभीर आणि मध्यम लक्षणं असलेल्या रूग्णांपैकी 20 टक्के रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज भासेल, असं नीती आयोगाने याआधीच स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, पहिल्या लाटेदरम्यान 100 पैकी 20 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  त्यापैकी 2.43 लोकांना आयसीयूची गरज पडली होती. तर दुसऱ्या लाटेवेळी म्हणजेच 1 जूनला देशातील सक्रिय रूग्णांची संख्या 18 लाख होती. तेव्हा 21.44 टक्के रूग्णांना 10 राज्यातील रूग्णालयात भरती करावं लागलं होतं. यापैकी 2 टक्के रूग्णांना आयसीयूची गरज पडली असल्याचं नीती आयोगाने यासंदर्भात माहिती दिली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्या बहिणीपासून लांब रहा’; ‘त्या’ वेळी रोहितला युवराज सिंहने दिली होती धमकी!

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”

“भाजप लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, राणेंना प्रसिद्धीचा मोह”

उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांना मोठा धक्का, बंगला तोडण्याचं काम सुरु!

भाजप प्रवेशासाठी राणेंनी दिलेल्या खुल्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More