Top News मुंबई

मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी

मुंबई | डिसेंबर आला तरीही मुंबईत थंडी आगमन काही झालं नव्हतं. मात्र शुक्रवारी अखेर मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली ती देखील तुरळक पावसासोबत.

शुक्रवारी सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली होती. दादर, माटुंगा, माहिम, बोरिवली तसंच वडाळा या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मुंबईत पावसासोबत ढगाळ वातावरणही पहायला मिळालं. दरम्यान 1-2 दिवसांमध्ये मुंबईतील ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सांगण्यानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी पश्चिम दिशेने जाणारे. त्यामुळे आपल्याकडचे वातावरण ढगाळ स्वरुपाचं आहे.

थोडक्यात बातम्या-

गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार का?, शरद पवार म्हणतात…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या