बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना सवाल केला आहे, की जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे, हे त्यांनी जाहीर करावं. किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जरंडेश्वर कारखान्याची कुंडलीच मांडली आहे.

हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर मिलची स्थापना केली होती. त्यांचे कुटूंब त्यामध्ये सहभागी होतं. त्यांना त्या वर्षी तोटा झाला. त्यामुळं त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवण्यास दिला होता. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहे. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयानं जरंडेश्वरच्या लिलावासाठीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आहे आणि तो कारखाना कोणी विकत घेतला याची यादीच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. तसेच त्यातील काही कारखाने स्वत:हा सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. साखर कारखाने मातीमोल भावाने विकले असं कसं म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी किती साखर कारखाने विकले गेले आणि कोणी विकत घेतले याची यादी त्यांनी जाहीर केली आहे. राज्यातील 65 साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

‘त्या’ प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले, म्हणाले ‘पोरांची नावं घेऊन…’

धक्कादायक! जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

‘त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?’; भर पत्रकार परिषदेत अजित पवार संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More