बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी केले मंजूर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे. दरम्यान या मंत्रिमंडळातील तब्बल 12 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांची मंत्रिमंडळात निवड करण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी पूर्वी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ.हर्षवर्धन यांच्यासह 12 मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 मंत्र्यांचा राजीनाम्याचा स्वीकार केला आहे. अवघ्या काही वेळातच मंत्रिमंडळ विस्तारातील शपथविधी सुरू होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांचा समावेश होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात यांची निवड केली जात आहे अशा चर्चा सध्या सुरू आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रासह इतरही राज्यातून अनेक नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या शपथविधी दरम्यान कोणाला कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More