बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींचं रुटीन चेकअप करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आर्मी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.

रामनाथ कोविंद नुकतेच हरिद्वारच्या दौऱ्यासाठी रवाना होणार होते, याठिकाणी २ दिवसांचा त्यांचा कार्यक्रम होता. यामध्ये एका पदवीदान समारंभाचा देखील समावेश होता, मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.

सकाळीच रामनाथ कोविंद यांना छातीत एकाकी दुखू लागल्याचं लक्षात आलं. त्रास असह्य झाल्यानं अखेर त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.

सध्या राष्ट्रपतींची प्रकृती स्थीर असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची देखील माहिती आहे. लवकर यासंदर्भात आणखी एक मेडीकल बुलेटीन काढण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा कॉलेज बंद राहणार- अजित पवार

UPSC चा सावळा गोंधळ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘त्या’ पत्रामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका

अजित पवारांचा पुणेकरांना अल्टीमेटम; लॉकडाऊनसंदर्भात केलं मोठं वक्तव्य

पुण्यात लॉकडाऊन लागणार का?; वाचा अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे

युपीएच्या नेतृत्वाबाबत संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More