कोलंबो | महागाई, रोजच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती यांना कंटाळून श्रीलंकेत जनक्षोभ उसळला. लाखो नागरिक रस्त्यावर उतरुन निदर्शने करु लागले. नागरीकांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा राजीनामा मागितला. त्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा देत देशातून पळ काढला. नागरीकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन तोडफोड केली तसेच राष्ट्रपती भवनाला देखील घेराव घातला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती गोटाबाया यांनी नागरीकांना घरघुती गॅस सिलेंडर वाटण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. आता गोटाबाया हे देश सोडून पळून गेल्याचे वृत्त येत आहे. श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानात पत्नी आणि दोन सुरक्षारक्षकांसह गोटाबाया देशातून फरार झाले आहेत. ते मालदिवमध्ये पळून गेल्याचे बोलले जात आहे. मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अँटेनोव्ह 32 या विमानात 4 प्रवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोटाबाया यांचा दुबईला जाण्याचा मानस होता. पण, बंदरनायके इंटरनॅशनल कर्मचाऱ्यांनी व्हिआयपी सेवांमधून माघार घेतली आणि सर्व प्रवाशांनी सार्वजनिक काउंटरमधून जावे अशी सूचना केल्याने, गोटाबाया यांना दुबईला पळता आले नाही.
श्रीलंकेतील स्थिती आता हाताबाहेर जात असून, संतप्त नागरीकांनी कोलंबोतील तीन मुख्य इमारती राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान यावर कब्जा केला आहे. नागरीकांनी राष्ट्रपतींना त्यांच्या पदाचा राजीनामा मागितला होता. परंतु त्यांनी नकार कळविला होता. आता गोटाबाया अटकेच्या भितीने परागंदा झाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
‘ही भूमिका अनाकलनीय’, शिवसेनेनं मुर्मूंना पाठींबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं ट्विट
संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले…
ईडी ना काडी, ‘या’ कारणामुळे शितल म्हात्रे शिंदे गटात सामील
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक
Comments are closed.