कोलंबो | श्रीलंका (Sri Lanka) आर्थिक आणीबाणीच्या संकटातून जात आहे. श्रीलंकेत मागील काही महिन्यांपासून रोजच्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नागरीकांना महागाई अनावर होऊन ते रस्त्यावर उतरले आणि लंकेत अराजकता माजली आहे. लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ आणि दंगली सुरु झाल्या आहेत. संतप्त नागरीकांनी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घातला आणि दोघांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
जनक्षोभाला घाबरून पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Vikramsinghe) हे रहाते घर सोडून परागंदा झाले होते. राष्ट्रपती देखील गेले काही दिवस अज्ञातवासात होते. आता त्यांनी अज्ञात ठिकणावरून नागरीकांना घरघुती गॅसचे योग्य वितरण करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे. श्रीलंकेला 3,700 मेट्रीक टन एलपी गॅस मिळाला आहे. नागरीकांसाठी हे दिलासादायक वृत्त आहे. मात्र, राष्ट्रपती सध्या कुठे आहेत, ते कोणालाच माहित नाही.
गेले काही महिने श्रीलंकेतील नागरीकांनी रस्ते बंद केले आहेत. संतप्त नागरिक सरकारला जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यासाठी प्रश्न विचारत आहेत. नागरीकांनी राष्ट्रपती गोगाबाया यांचा राजीनामा मागितला होता. पण, राष्ट्रपतींनी त्याला नकार देत आपले अधिकृत निवासस्थान सोडत पळ काढला होता.
श्रीलंकेतील युनायटेड नॅशनल पक्षाच्या सरकारने राजीनामा देऊन सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्याला पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी होकार दिला होता. मागच्या 7 दशकात कधी उद्भवली नव्हती अशी आर्थिक तंगी श्रीलंका सध्या झेलत आहे. श्रीलंकेत परकीय चलनाचा तुटवडा झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे.
थोडक्यात बातम्या –
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर
कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका, देशमुखांच्या जामीनाला आणखी एकदा नकार
शिंदे गट विरूद्ध शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून संजय राऊत आक्रमक, म्हणाले…
Comments are closed.