बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

नागपूर | भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सेनेमधील संघर्ष पाहायला मिळत आहे. नारायण राणेंना अटक झाल्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सेना आणि भाजपचे नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र अशातच विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी या वादावर भाष्य करताना राणे-ठाकरे एकत्र येणार असल्याचा दावा केला आहे.

हा वाद मिटेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नारायण राणे हे एका ताटात जेवतील. हे राजकारण आहे यामध्ये सर्व गोष्टी चालतात. सेना-भाजप विरोधात असले तरी ते उद्या एका ताटात जेवतील. हे कधी भांडतील आणि कधी एकमेकांच्या गळ्यात पडतील, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेने देश हिताचं काम केलं तर आम्ही शिवसेना जिंदाबाद म्हणू आणि भाजपने काम केलं तर भाजप जिंदाबाद म्हणू, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा देखील जय म्हणू. आम्ही आता कोणत्या दलाचे गुलाम नाही, असं तोगडिया म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी भारताला तालिबान्यांपासून धोका असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, जे शरणार्थी भारत अफगाणिस्तानमधून आणत आहेत त्यांचीच पिढी भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील. याचं जिवंत उदाहरण फ्रान्समध्ये पाहायला मिळत असल्याचंही प्रवीण तोगडिया म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या- 

बुधवारी झालेल्या लक्षणीय रूग्णवाढीनंतर पुण्यातील आजची आकडेवारी पाहा एका क्लिकवर!

अफगाणिस्तानमध्ये हाहाकार! काबूल विमानतळावर मोठा स्फोट

“तालिबानी आम्हाला काश्मीर प्रश्नावर मदत करणार आहेत”

“ओ लंके, 2 पावलं मागे नाही तर, 200 पावलं पुढे जात ठोकणार”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा केली- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More