बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपतींच्या सहीसह कृषी कायदे रद्द, पण शेतकरी ‘या’ मागणीवर ठाम

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला संबोधित करत अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे (Agricultural laws) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती. विरोधकांनी गदारोळ सुरु असताना संसदेत हे विधेयक पारित (Bill passed) करण्यात आलं होतं. त्यानंतर गदारोळातच हे विधेयक मागे देखील घेण्यात आलं आहे. (President Ramnath Kovind repeals the law by signing it)

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक मांडताना मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. गोंधळाच्या स्थित हे विधेयक पारित करण्यात आलं. त्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करत कायदा रद्द करण्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे.

तिन्ही कृषी कायदे रद्द झाले असले तरी शेतकरी मागे हटलेले दिसत नाहीत. MSPबाबत हमी देण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीवरून आता आंदोलन करणाऱ्या संघटनांमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता थंडीत शेतकरी आंदोलन चालू ठेवणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

दरम्यान, या वादग्रस्त कृषी कायद्यांना आता Farm Laws Repeal Act, 2021 , असं म्हटलं जाणार आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात हे सर्वात मोठं आंदोलन होतं. तब्बल वर्षभर चाललेलं आंदोलन आद्यापही मागे घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या मागणीवर केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पेच नव्या संघनायकाचा! कोहलीनंतर ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर RCBची धुरा?

पुण्यात दिवसभर संततधार पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

“ममता बॅनर्जी जेव्हा सातवीत होत्या तेव्हा शरद पवार…”

“हा घ्या पुरावा, हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण”

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More