राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या पगारात घसघशीत वाढ

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांना खूश करुन टाकलंय. अर्थसंकल्पात त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आलीय. 

राष्ट्रपतींचा पगार 1.5 लाखांहून 5 लाख, उपराष्ट्रपतींचा पगार 1.10 लाखांवरुन 4 लाख आणि राज्यपालांचा पगार 1.10 लाखांवरुन थेट 3.5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय.

खासदारांच्या वेतनाबाबतही मोठी घोषणा करण्यात आलीय. खासदारांचा पगार आता ठराव पास करुन ठरणार नाही. त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. त्यानंतर पाच वर्षांसाठी पगार कायम राहील, त्यानंतर महागाई निर्देशांकानूसार त्यात वाढ होईल.