Top News आरोग्य कोरोना राजकारण

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नवनीत राणा

मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरलं असल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरतंय. त्यामुळे आता यामध्ये केंद्राने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी नवनीत राणा यांनी एका मुलाखतीदरम्यान केली आहे.

याचदरम्यान कंगणा राणावत विषयी देखील नवनीत राणा यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, अभिनेत्री कंगणा राणावतने इतरांविषयी न बोलता केवळ स्वतःविषयी बोलावं. बॉलिवूड इंडस्ट्रीने कंगणाला सर्व काही दिलं आहे. त्यामुळे त्यावर आरोप करू नयेत.”

दरम्यान संजय राऊत आणि कंगणा राणावतच्या वादावर यापूर्वीही नवनीत राणा यांनी भाष्य केलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी राजीनामा द्यावा असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या