Top News

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

नवी दिल्ली |आमची लढाई दहशतवादाच्या विरोधात असून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद संपवणार नाही, तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू, असं आर्मी मेजर जनरल सुरेंद्रसिंग मेहल यांनी म्हटलं आहे. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या एकत्रि पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

27 फेब्रुवारीला पाकिस्तानने हवाई सीमेचं उल्लंघन केलं, पाकिस्तानने दोन बॉम्ब टाकले, मात्र भारताचं काही नुकसान झालं नाही, पाकिस्तानने अनेक खोटे दावे केले, नंतर त्यांनी ते बदलले, असं हवाईदल व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी म्हटलं आहे. 

भारताचं नौदल तयार आहे.जेव्हा देशाला गरज असेल तेव्हा आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असं नेव्ही रिअर अ‌ॅडमिरल दलविरसिंग गुज्जर यांनी म्हटलं आहे.

पाकिस्ताननं विंग कंमाडर अभिनंदन यांना सोडण्याच जाहीर केलं आहे, आम्ही अभिनंदनची वाट पाहत आहोत, असं एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी म्हटलं आहे.

आम्हाला जे टार्गेट करायचं होतं ते आम्ही केलंं आहे, याचे पुरावे आमच्याकडं आहेत, जेव्हा सरकारला मांडायचे ते मांडू, असं भारतीय लष्काराच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानी लष्करानं क्षेपणास्त्राचा मारा केला, असल्याचे पुरावे भारतीय लष्करानं पत्रकार परिषदेत मांडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या