Crime News | पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 3 वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या (Crime News) झाली होती. अखेर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी हा महिलेचा पतीच असल्याचं समोर आलंय. पतीनेच आपल्या पत्नीची सुपारी देऊन हत्या करण्यास सांगितलं होतं. क्राईम ब्रांच आणि विजयनगर पोलिसांनी अखेर या हत्या (Crime News) प्रकरणाचा उलगडा केला आहे.
आरोपी आपल्या पत्नीवर त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत होता. मात्र, पत्नी हे करण्यास नकार देत होती. याच कारणामुळे पतीने पत्नीच्या हत्येची सुपारी दिली आणि तिचा मृतदेह गौतमबुद्ध नगर क्षेत्रात फेकला.
नवऱ्यानेच दिली बायकोची सुपारी
बागपतच्या पावला खेडी गावात राहणाऱ्या फिरदौसचा विवाह विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मिर्झापूर गावातील रहिवासी इंतेजार उर्फ इंतूशी झाला होता. लग्नानंतर फिरदौस आणि इंतजार यांच्यात भांडणं सुरू झाली, त्यामुळे 2020 मध्ये फिरदौसने विजयनगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याशिवाय खर्चाचा दावाही कोर्टात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात इंतजारचे भाऊ आणि पुतण्यांनाही आरोपी करण्यात आलं होतं.
Crime News | मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती
या प्रकरणात फिरदौसने आरोप केला होता की तिचा पती तिच्यावर मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. तिच्या पतीचे मित्र आणि पुतण्याने तिच्या मुलींवर वाईट नजर ठेवली. याच कारणामुळे फिरदौस पतीपासून विभक्त झाली होती आणि मुलांसह एकाच घरात राहत होती.
या प्रकरणामुळे इंतजार, त्याचे भाऊ आणि पुतणे त्रस्त झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याच कारणावरून इंतजारने पुतण्या शादाबसोबत मिळून फिरदौसचा खून करण्याचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
फिरदौसच्या वडिलांना दिलेले 12 लाख रुपये त्यांनी परत न केल्याने तो फिरदौसला मारहाण करायचा. दरम्यान, इंतजार, शादाब खान आणि त्याचा सहकारी परवेज यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत सहभागी असलेला नौशाद एका दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“नासक्या आंब्याला खड्यासारखा बाजूला करणार”; शरद पवारांचा इशारा
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ऐश्वर्याला अभिषेककडून मोठ सरप्राईज!
गुड न्यूज! आयफोन झाले स्वस्त, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही
राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!