बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत बाजार समिती संचालकांकडे मागितली खंडणी

नाशिक | आजकाल बनावट अधिकारी बनून लोकांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेक घटनांमध्ये बनावट पोलिस अधिकारी बनून पोलिसांवरच ओरडून बडेजाव मिरवताना तोतया पोलीस अधिकारी आढळून आले. तसेच त्यांना बेड्या देखील ठोकण्यात आल्या. असाच एका तोतया अधिकाऱ्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.

नाशिकमधील बाजार समितीचे संचालक दिलीप थेट यांच्याकडे ईडीचा अधिकारी असल्याची बतावणी करत एका तोतया अधिकाऱ्याने खंडणी मागितली आहे. ‘तुमच्या विरोधात ईडीकडे तक्रार आली आहे, हे प्रकरण मिटवायचं असेल तर पैसे द्या’, अशा प्रकारची मागणी या तोतया अधिकाऱ्याने केली.

दरम्यान, या प्रकरणात नाशिक बाजार समितीचे संचालक दिलीप थेट यांनी नाशिक पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नाशिकच्या सायबर सेलमध्ये तोतया ईडी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर नाशिक परिसरात एकाच चर्चेला उधाण आलं आहे. दिलीप थेट यांच्याकडे खंडणी मागितल्याची बातमी नाशिकमध्ये वार्‍यासारखी पसरली आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली पण अशा तोतया अधिकाऱ्यांना जेरबंद करून कडक शासन करणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या

येत्या 3 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ करणार ‘या’ देशाचा दौरा; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा

कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करायला गेले 100 जण, 21 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

देशभरात 1 लाख बनावट रेमडेसिवीर विकले, पोलीस तपासात आणखीही अनेक धक्कादायक खुलासे

“कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी आता भारताकडे ‘हा’ एकच पर्याय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More