सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरल्यास ‘अॅट्रॉसिटी’ लागणार

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना जातिवाचक शब्द वापरल्यास संबंधित व्यक्तीवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वयेच कारवाई होईल. दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्यावर सुनावणी करताना हा महत्त्वाचा निर्णय दिला. 

फेसबुकसह व्हॉट्सअॅप, ट्विटर यासारख्या सोशल मीडिया साईट्सवर अनेकजण जातिवाचक शिवीगाळ करत असतात. या निर्णयामुळे असे प्रकार कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, फक्त पब्लिक नाही तर प्रायव्हेट पोस्टमध्येही जातिवाचक शब्द वापरल्यास अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या