बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांना मोठा झटका, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ ?

नवी दिल्ली | वाढत्या महागाईची झळ सर्वांनाच बसत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत तब्बल 10 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गहू, तेल आणि पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याने एफएमजीसी (FMGC) कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) मोठा फटका एफएमसीजी कंपन्यांना बसला आहे. परिणामी गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलांच्या किंमती वाढणार असल्याचं कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. उद्योग क्षेत्राकडून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काही अहवालांनूसार, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले या कंपन्यांनी गेल्या आठवड्यातच त्यांच्या खाद्य उत्पादनाच्या किमतीत वाढ केली आहे. तर डाबर आणि पार्ले सारख्या कंपन्या लवकरच मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“… तर भाजपवाले कधीपासून हिंदु झाले पाहावं लागेल”

शेकडो नागरिकांनी आश्रय घेतलेली ‘ती’ इमारत रशियाकडून उद्ध्वस्त

“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार”

मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने जगाचं टेंशन वाढलं

‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो…’,करूणा शर्मांचं खळबळजनक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More