बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भन्नाट फिचर्स असलेल्या Realme C33 विक्री सुरू, मिळणार फक्त ‘इतक्या’ हजारांत

नवी दिल्ली । Realme कंपनीने काही दिवसांपुर्वीच भारतात आपले नवीन घड्याळ आणि नवीन इयरबड्ससह Realme C33 लाँच केले. Realme C33 (Unboxing) ची पहिली विक्री आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी आहे. Realme C33 आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे.

Realme C33 चा मागील बाजू म्हणजेच पॅनल हा ग्लॉसी फिनिशसह काचेचा बनवण्यात आला आहे. Realme C33 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. Realme C33 मध्ये Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. आपण आज या फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया चला जाणून घेणार आहोत.

Realme C33 ची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. या किंमतीत 3 GB रॅमसह 32 GB स्टोरेजचे मॉडेल उपलब्ध असेल. तर 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

realme C33 मध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये 4 GB पर्यंत रॅम आणि 64 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. Realme C33 मध्ये Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. मेमरी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येते.

realme C33 मध्ये दोन रियर कॅमेरे आहेत ज्यात Primary Lense 50 मेगापिक्सेल आहे आणि यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंसला सपोर्ट देखील आहे. मागची दुसरी लेन्स 0.3 मेगापिक्सेलची आहे. सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. रिअ‍ॅलिटीच्या या फोनमध्ये पोर्ट्रेट विथ कॅमेऱ्यासारखे अनेक मोड देण्यात आले आहेत.

Realme C33 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या Realme फोनमध्ये 4G VoLTE, 4G LTE, WCDMA, GSM, 3G, 2G, ब्लूटूथ v5.0, 3.5mm हेडफोन जॅक आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More