बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार

नवी दिल्ली | महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन वस्तूंसाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणि गृहिणींसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे.

नुकताच जीएसटीची (GST) 47 वी बैठक पार पडली आहे. याबैठकीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. 18 जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दर वाढणार असल्याचं सांगितलं आहे.

18 जुलैपासून टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 5% दराने जिएसटी लागणार आहेत. नवीन चेकबूक घेतल्यास 18%  जिएसटी लागू होईल. रुग्णालयातही 5000 पेक्षा जास्त भाडं असणाऱ्या रूम्सना 5% टक्के कर भरावा लागेल. 1000 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल रुम्सवर 12% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. एलईडी लाईट्स, एलईडी दिव्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

काही वस्तूंमध्ये हे दर कमी करण्यात आले आहेत. रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीवर जीएसटी दर 5 करण्यात आला आहे. जो यापूर्वी 18 होता. फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसिस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्राओक्युलर लेन्स इ. जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. संरक्षण दलांसाठी आयात केलेल्या वस्तूंना IGST मधून सूट देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी

मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर 

शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, बंडखोर आमदाराचं सूचक वक्तव्य

‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघात

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More