Top News महाराष्ट्र मुंबई

5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!

मुंबई | SMA या आजाराने ग्रासलेल्या 5 महिन्यांच्या तीरा कामतच्या मदतीसाठी आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकार देखील धावून आलं आहे. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या औषधांसाठीचा 6 कोटींचा कर माफ केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीरा कामतला मदत करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. फडणवीसांच्या या पत्राला मोदींनी प्रतिसाद देत तीराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांवरील 6 कोटींचा कर माफ केला आहे. याचबरोबर राज्य सरकारनेही कामत कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे.

SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. कस्टम ड्यूटी माफ केल्याचं राज्य सरकारने नमुद केलं आहे.

दरम्यान, 5 महिन्यांची तीरा कामत मुंबईच्या SRCC रुग्णालयात उपचार घेत आहे. तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा आजार झाला आहे. या आजारावर भारतात उपाय नाही. तसेच या आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत आहे तब्बल 16 कोटी रुपये होती. 16 कोटी रुपये जमा करण्यासाठी तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडला. यातून 16 कोटी रूपये ही रक्कम जमा झाली, मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी काही अडथळे येत होते. मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारांनी औषधावरील कर माफ केल्यामुळे तीराचे उपचार लवकर होण्यास मदत होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?”

सचिन तेंडुलकरला मोठा धक्का, मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून डच्चू!

पुण्यातील स्नेहल काळभोर अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच!

गोल्डनमॅन असणं ठरतंय शाप; ‘या’ चार गोल्डनमॅनला मृत्यूनं अकाली गाठलं!

तरुणीचा लग्नाला नकार, ‘प्रपोझ डे’ दिवशी तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या