बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधानांनी बोलवली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. परिणामी, रुग्णांना आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या एक बैठक बोलावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक उद्या सकाळी 11 वाजता बोलावली असून या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. दर दिवशी देशात तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, त्याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या सकाळी 11 वाजता बोलावली आहे. या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. त्याबरोबरच या बैठकीत काही महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही भारतात असणाऱ्या अमेरिकेच्य नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार नेमक्या कोणत्या उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील”

“20 मिनिटात ॲम्ब्युलन्स नाही आली, तर मी सगळ्या ॲम्ब्युलन्स रॉकेल टाकून फुकुन देईल”

“कोरोना संसर्ग वाढवण्यास लसी न घेणारे लोकचं कारणीभूत आहेत”

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 88 व्या वर्षी केली कोरोनावर मात

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सरकारला ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More