बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC मध्ये पहिल्या आलेल्या शुभमला नरेंद्र मोदींचा अमेरिकेतून फोन!

नवी दिल्ली | देशातील व्यवस्थेला चालवण्याची जबाबदारी अधिकारी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलत असतात. देशातील लाखो विद्यार्थ्यामधून युपीएससी अंतीम निकाल लावत असते. या वर्षीचा निकाल घोषित झाला आहे. बिहारचा शुभम कुमार देशात अव्वल आला आहे.

शुभम कुमारने सलग दुसऱ्या वर्षी हे यश संपादन केलं आहे. परिणामी देशभरातून त्याच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे. देशातील नवीन अधिकारी पिढीला नवीन वाटचालीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशातून अव्वल आल्याबद्दल शुभम कुमारला मोदी यांनी थेट अमेरिकेतून फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मोदी यांनी शुभम कुमारचं अभिनंदन केलं आहे. आयआयटी मुंबईतून शुभम कुमारनं सिविल इंजिनीअरिंग केली आहे. शुभम या अगोदर पण युपीएससी उत्तीर्ण झाला आहे.

शुभम बिहारच्या कटिहारचा रहिवासी आहे. शुभम गतवर्षी 290 व्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला होता.24 वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शुभमचे वडील ग्रामीण बँकेत व्यवस्थापक आहेत.

थो़डक्यात बातम्या 

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More