बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरु होत आहे. पेगॅसस प्रकरणावरुन पावसाळी अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ उडालेला पाहायला मिळाला. अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एकच दिवस सभागृहात आले होते.

याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षातील नेत्यांनी मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ऑब्रायन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करत मोदींना सभागृहात येण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या आणि आमचं म्हणणं ऐका, असं कॅप्शन ऑब्रायन यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांनी मिळून प्रसारित केलेल्या या व्हिडीओमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील काँग्रेसची बाजू मांडली आहे. गेल्या 14 दिवसांपासून आम्ही याप्रकरणी चर्चेची मागणी करत आहोत. मात्र त्याला परवानगी देण्यात येत नाही. तुम्ही इतर विधेयकं मंजूर करुन घेत आहात. तुमच्यात हिम्मत असेल तर चर्चा करा, असं खर्गे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक गुरुवारी संसदेत येत असतात. अधिवेशनाच्या काळात देखील ते संसदभवन परिसरातील आपल्या कार्यालयात उपस्थित राहिले. मात्र ते सभागृहात आले नाहीत. यामुळे विरोधक मोदींवर कडाडून टीका करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

रोख व्यवहार करणाऱ्यांनो वेळीच व्हा सावधान; 10 व्यवहार केल्यानंतर….

भारत रशिया पंतप्रधानांची आज भेट; मोदी-पुतिन भेटीकडं जगाचं लक्ष

‘…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार’; इम्तियाज जलिल यांचा इशारा

लस घेतल्यानंतर तुम्ही ‘इतके’ दिवस सुरक्षित राहणार; एम्सच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More