बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना भारतात येण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार”

अकोला | भारतात कोरोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते अकोल्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

कोरोना आणि टाळेबंदीवरून उद्भवलेल्या परिस्थितीवरून प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात योग्य वेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांची चाचणी करून त्यांना प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या प्रमाणात कोरोना पसरलाच नसता, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाबाधितांची संख्या कमी असतांना कडक टाळेबंदी आणि आता रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात जात असतांना टाळेबंदी शिथिल करण्यात येत आहे, हा सर्व प्रकार अनाकलनीय असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

दरम्यान, मूळात टाळेबंदी लागू करणंच चुकीचं आहे. आतापर्यंत साथीचे अनेक आजार आले. मात्र कधी टाळेबंदी लागू करण्यात आली नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”

महत्वाच्या बातम्या-

भारत कोरोनाचा जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर; ‘ही’ गोष्ट ठरतेय सर्वात घातक

बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

महिलेला काचेचा दरवाजाच दिसला नाही, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा CCTV फुटेज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More