Top News देश

पंतप्रधान मोदींचा मास्क घालण्यास नकार, व्हायरल व्हिडिओमुळे मोदी झाले ट्रोल

नवी दिल्ली |  एका कार्यक्रमाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मास्क घालण्यास नकार दिला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या ट्विटर आकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून ‘मास्क घाला मोदीजींसारखे’ वागू नका असं कॅप्शनही दिलं आहे.

अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीवर टीका करत आहेत. एरवी पंतप्रधान मोदी सतत आपल्या भाषणांमधून नागरिकांना ‘दो गज की दुरी’ पाळण्याचे आणि मास्क परिधान करण्याचे आवाहन करत असतात. मात्र, आता मोदींनीच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा नियम बाजूला सारल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोदींनी हस्तकला या मेळाव्याला भेट दिली होती. त्यावेळी मोदी तिथं असलेल्या गोष्टी पाहताना त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. तेव्हा एका स्टॉलवरील माणसाने मोदींना मास्क दिला. मात्र मोदींनी तो मास्क घेण्यास नकार दिला. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देत असल्याचं दिसून येतं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी मास्क परिधान केले आहेत.

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत आम आदमी पक्षाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार

“थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड…”; भातखळकरांचा शिवसेनेला टोला

‘आता विवाहित मुलिलाही मुलाप्रमाणे…’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

“अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, मात्र मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या”

“आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या