Top News

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

नवी दिल्ली |  विरोधी पक्ष तुम्हाला नकारात्मक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील मात्र त्यांच्या प्रयत्नांनी तुम्ही विचलित होऊ नका. सकारात्मक गोष्टी पाहा… असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आज ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी आज भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला खरा पण आज देशातली सर्वांगीण परिस्थिती पाहता त्यांनी खरंच हा संवाद साधायला हवा होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदींच्या संवाद साधण्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आजचा कार्यक्रम रद्द करायला हवा होता, असं त्यांनी म्हणणं होतं.

आपले बूथ हीच आपली ताकद आहे, आपला किल्ला आहे. त्यामुळे बूथ जिंकलं तर ‘संकल्प से सिद्धी’ हे आपलं ब्रीदवाक्य प्रत्यक्षात येईल, असंही मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

पाकिस्तानला घरचा आहेर! ‘पाक’च्या माजी पंतप्रधानाची नात इमरान खानला म्हणते….!’

अटी-बीटी काही नाही, गप्प अभिनंदन यांना सोडा, नाहीतर…!; भारताने ठणकावलं

-पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाचं जागा वाटप ठरलं!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या