Top News देश

पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव

नवी दिल्ली | राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना ‘आंदोलनजीवी’ या शब्दाचा वापर केला होता. त्यांनी वापरलेल्या या शब्दावरुन राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरतात. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी त्यांना अशा पद्धतीचं बोलणं शोभत नाही, असं म्हणत योगेंद्र यादवांनी मोदींवर हल्लाबोल केला.योगेंद्र यादव फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते.

मोदींनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस विरोधात जनआंदोलन करण्याबाबत बोलत होते. मात्र आता त्यांना आंदोलन खटकत असल्याचं यादवांनी सांगितलं.

दरम्यान, दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्याला परजीवी म्हणतात. पंतप्रधान मादींनी आज एक नवा शब्द जन्माला घातला असल्याचही योगेंद्र यादव म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं

‘या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी

आठवड्यात तीन सुट्ट्या?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”

धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या