बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत जाहीर करावी”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात अतिमुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. अशातच आता गुलाब चक्रीवादळाचा फटका राज्यातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यातील शेतीची पाहणी केली आहे. वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला एक हजार कोटींची मदत जाहीर केली होती. याच धर्तीवर मोदींनी महाराष्ट्रातील नुकसान पाहता त्यांनी राज्याला 7 हजार कोटींची मदत मागितली आहे. याचबरोबर राज्यातील विरोधी पक्षांना देखील आम्ही भेटणार आहोत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या पाऊसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्वच जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहेे. तसेच बहुतांश ठिकाणी नदीकाठची शेती पाण्यात वाहून गेली आहे. सोयाबीन आणि ऊसाचं मोठ्या प्रमाणात भरून न येणारं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळाची घोषणा करत मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या –

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावूक

43 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली अन् पठ्ठ्याला लागली 1448 कोटींची लाॅटरी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More