बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

नवी दिल्ली | फ्रान्स सरकारने भारताशी झालेल्या राफेल युद्ध विमान खरेदी करारामधील कथित भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. यानंतर काँग्रेसने मोदी सरकारला घेरलंय. राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असं आव्हान काँग्रेसने मोदींना दिलं आहे.

देशाच्या सुरक्षेतून मोदी सरकारने आपल्या मित्रांची तुंबडी भरली. राफेल सौद्याच्या चौकशीसाठी फ्रान्सने न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. पण गेल्या 24 तासांत भारत सरकारकडून याप्रकरणी कुठलीही प्रतिक्रया का आली नाही, असं काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर राफेल सौद्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोपांना आणि त्यासंबंधी प्रश्नांना उत्तरं द्यावीत. राफेलच्या चौकशीवरून संपूर्ण मोदी सरकार गप्प का, राफेल करारात ज्या देशाला फायदा झाला आहे, त्या फ्रान्समध्ये चौकशी सुरू आहे. पण ज्या देशाच्या नागरिकांच्या कराचा पैसा लुटला आहे, त्या देशात चौकशी होत नाही. राफेल डीलमध्ये मध्यस्थाला कोट्यवधीची भेट दिली गेली, हे कागदपत्रांवरून उघड होत आहे, अशी टीका खेडा यांनी केली.

दरम्यान, फ्रान्सनेही राफेल व्यवहाराची चौकशी सुरू केली. आता तरी मोदी सरकार भारतात संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला परवानगी देणार का? असा सवाल काँग्रेसने विचारलाय.

थोडक्यात बातम्या- 

“विरोधकांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत”

पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोडली ‘ही’ परंपरा

“भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केलं तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही”

स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच- मोहन भागवत

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; सरकार मांडणार ‘हे’ 3 मुख्य प्रस्ताव

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More