देश

राजीव गांधींवर टीका केल्याने मोदी चांगलेच ट्रोल; लोकं म्हणतायेत मत मिळविण्यासाठी काहीही…

नवी दिल्ली |  तुमच्या वडिलांचं आयुष्य ‘एक नंबरचं भ्रष्टाचारी’ म्हणूनच त्यांचं आयुष्य त्यांच्या ओळखीसकट संपलं, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केली होती. त्या टीकेनंतर लोकांनी पंतप्रधान मोदींना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

पत्रकार सागरिका घोस यांनी राजीव गांधींना देशाच्या दुश्मनांनी वाईट पद्धतीने मारलं होतं. एका दिवंगत पंतप्रधानांना फक्त मतांसाठी लक्ष्य करणे बरोबर आहे? असा सवाल मोदींना केला आहे.

आशिकबाई यांनी ‘शिक्षित आणि अशिक्षीत लोकांमधला फरत आहे तो हाच’ असं लिहून राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातल्या वक्तव्याचा दाखला दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील पंतप्रधानांनी केलेल्या व्यक्तीगत टीकेचा निषेध केला आहे.

काँग्रेस समर्थकांनी #ShameOnPmModi असा ट्रेंड चालवून पंतप्रधान मोदींच्या व्यक्तीगत टीकेचा निषेध व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून मायावतींनी अमेठी रायबरेलीची जागा लढवली नाही!

-ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

-या विदेशी लोकांनी देश लुटला; काँग्रेसचं नाव न घेता विवेक ओबेरॉयची टीका

-‘या’ कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव

-माझ्यावर होणारे हल्ले भाजपने घडवून आणले- अरविंद केजरीवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या