बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज 75 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करणार

नवी दिल्ली | भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ध्वज फडकावतील आणि देशातील जनतेला संबोधित करतील.

मोजक्या उपस्थितांसह हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमंत्रित केलं आहे. मात्र हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार असल्यानं देशभरातील नागरिकांना घरबसल्या हा स्वातंत्र्योत्सव पाहता येणार आहे.

समारंभात कोरोना नियम पूर्णपणे पाळले जातील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीला बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागले. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राला संबोधित करतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेसात वाजता लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून आठव्या वेळी ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर राष्ट्राला संबोधित करतील.

थोडक्यात बातम्या-

“कष्टाने मिळालेलं स्वातंत्र्य वाचेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम!

तापाने फणफणलेल्या भारताचा सुवर्णपदकवीर नीरजच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला…

“महामार्गांच्या कामात मोठा भ्रष्टाचार, चौकशी झालीच पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More