मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शीळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी 14 जून मंगळवार रोजी देहू येथे येणार आहेत.
लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 2 वाजता सभा घेणार आहेत. मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत असून देहूला छावणीचं स्वरूप आलं आहे.
सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या प्रश्नामुळे मुख्य मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. केवळ पासधारकांनाच मंदीर परिसरात प्रवेश मिळणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड ऑडनन्स फॅक्टरी कमान ते गाव रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यासाठी निगडीतील भक्तीशक्ती चौक व त्रिवेणी नगर तळवडे कॅनबे चौक हा पर्यायी रस्ता असेल.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून मोदींच्या देहूतील सभेआधी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला पोलिसांची नोटीस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती होणार?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाल्या…
‘…तर मला आणि भाजपला मैदानात उतरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
Comments are closed.