बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंतप्रधान मोदींनी माझ्या लोकप्रियतेमुळेच टिकटाॅकवर बंदी आणली’

पाटणा | बिहारची राजधानी पाटणा येथे राजदच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमापुर्वी सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. संघटनेच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये तेजस्वी यादव यांना स्थान न दिल्याने रविवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये लालुप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी त्यांच्याच पक्षाध्यक्षांना हिटलर म्हणून संबोधित केलं. तेजप्रताप यादव हे एवढ्यावरच न थांबता ते समाज माध्यमांवर सुद्धा संतापले

बिहारमध्ये समाज माध्यमांवर बंदी घालायला हवी. कारण लोक चुकीचा वापर करत आहेत. माझी लोकप्रियता पाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिकटाॅकवर बंदी घातली असल्याचं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं आहे. लोक माझी खिल्ली उडवतात, वेळ आल्यावर त्यांनाही उत्तर देऊ असं ते म्हणाले.

राजदच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात राज्यातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ आणि विभागीय अध्यक्ष यांच्या बैठकीमध्ये तेजप्रताप यादव बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलं की, आपल्या कन्हैय्याजींचे (तेजप्रताप यादव) चाहते टिकटाॅकवर प्रचंढ मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिकटाॅकवर बंदी घातली आहे.

दरम्यान, काही लोकांना वाटतं की राजदचे तिकीट कोट्यवधी रूपये देऊन मिळवलं जाऊ शकतं. मात्र त्यांना लक्षात हवं की हा पक्ष गरीब लोकांचा आहे. समाज माध्यमांचा आपण योग्य वापर करायला हवा असंही तेजप्रताप यादव यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

भारताला क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय रोजंदारीवर काम!

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पावसाचं पुन्हा कमबॅक! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

नीरज मराठाच, त्याच्या घरी मी जाऊन आलोय- खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More