Top News देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

नवी दिल्ली | गुरुवारी लोकशाहीत अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना मूलभूत अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. केंद्र सरकारचा कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती देण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला सरकरानी अमान्य केला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र ट्विट केलं असून शेतकऱ्यांना ते वाचण्याचं आवाहन केलं आहे.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं.”

नरेंद्र तोमर यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये केंद्र सराकरने कृषी कायद्याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. विरोधक शेतकऱ्यांची दिशा भूल करत असल्याचा आरोप करत सरकारने म्हटलं की, ‘गेल्या 20 ते 25 वर्षात कोणत्याही शेतकरी नेता किंवा संघटनेचं वक्तव्य दाखवा ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे’, असं म्हटलं आहे.

नवे कृषी विधेयक शेतकऱ्यांची दलालांमधून मुक्तता करत आपला माल देशातील कोणत्याही बाजारात विकण्याचं स्वातंत्र्य देत असून उत्पन्न वाढवण्यास मदत करणार आहे. कृषी बाजार किंवा मंडी जिथे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी किंमत, मुलभूत आधार, मिळते ते तसंच राहील, असा विश्वास पत्राव्दारे देण्यात आला आहे. तसेच एपीएमसीला अजून मजबूत करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण

‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

गोपिचंद पडळकरांचे संजय राऊतांना पत्र; शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमच्या…

“उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करणार नाही”

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि मिळवा एक लाखाचं बक्षीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या