बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन, म्हणाले…

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेसने विजयी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसला येथे स्पष्ट बहुमत दिसत आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजप जनतेची सेवा करत राहील. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकत्यांचे आभार मानत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेस 209 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 82 तर इतर 2 जण आघाडीवर आहेत. देशाचं लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममधून भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवारांना गर्व झाला होता, त्यांची टगेगिरीची भाषा होती, तो गर्व मोडून काढला”

नंदिग्राममध्ये ममतांचा खरंच पराभव झाला का?, तृणमूलचं महत्त्वाचं ट्विट

आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचं संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावं- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More