देश

नितीन गडकरींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली नवी जबाबदारी

नवी दिल्ली | कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रभावीपणे उपाययोजना करत आहे. यादरम्यान राज्य सरकार हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

आजारावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन होते किंवा नाही. तसेच केंद्राकडून अधिक मदतीची गरज आहे का, याबाबत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या  जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, असं गडकरींना सांगण्यात आलं असल्याची माहिती समजत आहे.

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार गडकरी यांनी राज्यातील 17 जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आँणि कोरोनामुळे देशभरात उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार जनतेच्या व अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संदेश दिला.

दरम्यान, राज्यातील संपूर्ण यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करोनावर मात करण्यासाठी मागील दोन आठवडय़ांपासून दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. खुद्द ठाकरे यांचे पंतप्रधानांशी वेळोवेळी दूरध्वनीवरून बोलणंही झालं आहे. असं असताना मोदी यांनी राज्य सरकारच्या मदतीने केंद्राच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याऐवजी गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार

जम्मू-काश्मीरमध्ये 8 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

महत्वाच्या बातम्या-

फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या