नवी दिल्ली | आरोग्य हीच संपत्ती आहे हे मावळत्या वर्षाने शिकवलं. 2020 हे आव्हानांचं वर्ष होतं. 2020चा मंत्र ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ हा होता. आता 2021चा मंत्र -आपल्याकडे ‘औषध आहे आणि सावधगिरीसुद्धा’ हा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
राजकोट येथील नव्या ‘एम्स’चा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे नैराश्याचं वातावरण होतं, सगळीकडे संशयाचं वातावरण होतं, मात्र 2021 हे कोरोनावरील उपचाराचा आशेचा किरण घेऊन येत आहे, असं मोदी म्हणाले.
जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेसाठी भारत सज्ज असल्याचा विश्वासही या वेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.
थोडक्यात बातम्या–
कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील
कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद
समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं
‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक
पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल