बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमचे कायदामंत्री सुपर डान्सर! नरेंद्र मोदींनी किरेन रिजिजूंचं केलं कौतुक!

नवी दिल्ली |  केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू हे बुधवारी अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. अरूणाचल प्रदेशमधील विविध प्रकल्पाचा आढावा घेत असताना तेथील स्थानिक गावकऱ्यांसोबत किरेन रिजिजू हे लोकगीतावर थिरकले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा किरेन रिजिजू यांचं कौतुक केलं आहे. किरेन रिजिजू यांनी आपल्या डान्सच्या व्हिडीओसोबत एक ट्विट केलं होतं.

विवेकानंद केंद्र विद्यालय योजनेचा आढावा घेण्यासाठी कजलांग गावाचा शानदार दौरा झाला. पाहुणे आपल्या गावाला भेट देण्यासाठी येतात तेव्हा सजोलांग गावकऱ्यांकडून पारंपारिक मनोरंजन केलं. अरूणाचल प्रदेशातील प्रत्येक समाजातील मूळ लोकगीते आणि नृत्य प्रत्येक आवश्यक असतात, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.

किरेन रिजिजू यांनी त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर आहेत. अरूणाचल प्रदेशची जिवंत आणि गौरवशाली परंपरा पाहून आनंद वाटल्याची प्रतिक्रिया देखील नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

दरम्यान, किरेन रिजिज हे अरूणाचल प्रदेश पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आरोग्य आणि तंदुरूस्तीशी संबंधित व्हिडीओसह ते आपली गाणीही सोशल मीडियावर अपलोड करत असतात. त्यामुळे किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

बाबो! ‘मनिके मागे हिते’ गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडीओ

…तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पालकमंत्रिपदावरून हटवतील- छगन भुजबळ

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले…

आर. आर. पाटलांच्या बंधूंचा आईसोबतच्या व्हायरल फोटोमागील कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

“व्वा रे बिट्या, तुला कुणी सांगितलं?; महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरूंगात जाईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More