बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ‘मन की बात या” कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. मला सत्तेत नाही तर सेवेत राहायचं आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना बोलून दाखवल्या आहेत.

आयुष्यमान भारत या योजनेचा (Ayushyaman Bharat) लाभ घेत राजेश प्रजापती यांच्या ह्रदयावर उपचार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजेश प्रजापती यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी राजेश प्रजापती यांनी सर तुम्ही कायम सत्तेत राहो याकरीता शुभेच्छा आणि त्यांनी पंतप्रधानांच्या दिर्घायुष्याची कामना केली होती. त्यावर नरेंद्र मोदी यांनी तुम्ही मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका, असं म्हटलं आहे.

तसेच मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको मला फक्त सेवा करायची आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त जे कार्यक्रम देशभरात राबवले जात आहेत. त्यामधून सकारात्मक प्रवाह वाढतोय. डिसेंबरमध्ये नौदल दिवस, सैन्य दिवस देशात साजरा केला जातो, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदीवासी समाजाने स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं योगदान तसेच राणी दुर्गावती यांच्या योगदानाचं स्मरण मन की बातच्या माध्यमातुन केलं आहे. देशभक्तीपर गीते, रांगोळी लेखन यांसारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यात यावे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

भय्यू महाराज प्रकरणी धक्कादायक खुलासा, चॅटपाहून पोलिसांनाही बसला धक्का

“पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

“नारायण राणे म्हंटल्याप्रमाणं इतिहास घडेल अन् सरकार पडेल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More