बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लतादीदी मला नेहमी म्हणायच्या माणूस आपल्या वयानं नाही तर…”, नरेंद्र मोदी भावूक

मुंबई | आपल्या सुमधूर आवाजानं जगातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकरांनी आठवण होत नाही असं गीत सध्यातरी नाही. एखादं गीत कानावर पडलं की आपल्याला आपोआप लतादीदींची आठवण येते. पहिल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं की अनेकांना लतादीदीची आठवण आली.

मुंबईत षन्मुखानंद सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी संपुर्ण मंगेशकर कुटुंबासह रसिक श्रोते देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी भावनिक भाषण करत सर्वांना लतादीदींची आठवण करून दिली. लतादीदींसोबतच्या आठवणींनी मोदींनी उजाळा दिला आहे. लतादीदींसोबतची पहिली भेट देखील मोदींनी सांगितली आहे.

मी लतादीदींचा खूप आदर करायचो, त्या मला नेहमी म्हणायच्या माणूस वयानं नाही तर कर्तुत्वानं मोठा असतो. जो देशासाठी जितकं कार्य करतो तो तितका मोठा असतो. व्यक्तींच्या विचारांवरून व्यक्तीचं महात्म्य लक्षात येतं. लतादीदींनी संगीतात जे काम केलं त्यावरून लोक त्यांना सरस्वती म्हणतात. चार-पाच पिढ्यांना संगीत देण्याचं काम लतादीदींनी केलं आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, ह्रदयनाथ मंगेशकरांची तब्येत ठिक नसल्यानं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या तब्येतीसाठी मोदींनी प्रार्थना केली. मंगेशकर कुटुंब पिढ्यानं पिढ्या संगीताच्या यज्ञात आहुती देत आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“…नाहीतर उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही”

“कोण हा फडतूस रवी राणा?, प्रश्न जर सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या…”

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी?, देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…

रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More