बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद”

नवी दिल्ली | देशात विरोधकांची आघाडी उभारणे आणि पुढील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत(2024 Lok Sabha Election) भाजपला(BJP) म्हणजेच पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना(PM Narendra Modi) सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला चिमटे काढले आहेत.(Prashant Kishor criticized the Congress)

यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच ऐकतात आणि ही त्यांची सर्वांत मोठी ताकद आहे. त्यांना माहिती आहे की, लोकांना काहीतरी हवं आहे. तसेच येत्या काही दशकांमध्ये देशातील राजकारण भाजपभोवतीच फिरणार आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाला वाचवायचं असेल तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याबाहेरच्या नेत्याची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करावी, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून तुम्ही भाजपला कधीचं हरवू शकत नाही, असं प्रशांत किशोर काँग्रेसला उद्देशून म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसशिवाय देशात मजबूत विरोेधी पक्ष उभा करणे शक्य आहे. तसेच  प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(West Bengal CM Mamata Banerjee) यांनी केलेल्या ‘अरे काय युपीए आता युपीए नाही’ या विधानाचं समर्थन केलं आहे. गेल्या 10 वर्षांतील निवडणुकीत काँग्रेसला 90 टक्के पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आघाडी केली म्हणजे आघाडीत आलंच पाहिजे असं काही नाही, कुणालाही कसलं बंधन नाही”

“पुढच्या आठवड्यात एका भाजप नेत्याला अटक होणार”

“मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी देण्यात येणार”

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं”

“किरीट सोमय्या यांना ईडीचा अधिकृत प्रवक्ता घोषित करावं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More