बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं केलं कौतुक, म्हणाले…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. मोदी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत ओम बिर्ला यांनी अशी अनेक पाऊले उचलली आहेत ज्यांनी आपली संसदीय लोकशाही समृद्ध केली आहे आणि उत्पादकता वाढविली आहे. यामुळे अनेक ऐतिहासिक आणि लोक-समर्थित कायदे संमत झाले आहेत. या कामांबद्दल ओम बिर्ला यांचं अभिनंदन.

तसेच मोदी पुढे म्हणाले की, ओम बिर्ला यांनी पहिल्यांदा निवडून आलेले खासदार, युवा खासदार आणि महिला खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यावर विशेष जोर दिला आहे. आपल्या लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका असणार्‍या विविध समित्यांचे त्यांनी बळकटीकरणही केले आहे.

दरम्यान, ओम बिर्ला यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच सभागृहातील एक फोटो देखील शेअर केला आहे. ओम बिर्ला यांनी शेअर केलेला फोटो सभागृहातील आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी ओम बिर्ला यांचंं अभिनंदन करताना दिसत आहेत.

सभागृहातील फोटो शेअर करत ओम बिर्ला म्हणाले की, 17 व्या लोकसभेचे सभापती म्हणून माननीय पंतप्रधान, सभागृहातील सर्वच पक्षातील नेते आणि सन्माननीय सदस्यांची आपुलकी व सहकार्य लाभले. सन्माननीय सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी लोकसभेने दोन वर्षात ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

थोडक्यात बातम्या – 

नाशिक दुर्घटनेत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले 10 लाख रुपये घेऊन सून फरार

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More