बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री’; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योगींचं कौतुक

वाराणसी | आज उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री योगी प्रचंड मेहनत करत आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते गुरुवारी वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.

माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. आज गुन्हेगारांना समजले आहे, की ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या व्यवस्थापनाचंही कौतुक केलं. उत्तर प्रदेशची लोकसंख्या अनेक देशांपेक्षा अधिक आहे. तरीही येथील सरकार आणि लोकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला, असं मोदी म्हणाले.

आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत. 2017 पूर्वीही दिल्लीतून उत्तर प्रदेशसाठी पैसा पाठवला जात होता. मात्र तेव्हा लखनऊमध्ये त्याला अडथळा यायचा. मात्र आता स्वतः योगी येथे येऊन विकास कामांवर लक्ष ठेवतात. ते प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि वेग-वेगळ्या कामांवर लक्ष ठेवतात. यामुळेच उत्तर प्रदेशात परिवर्तन होताना दिसत आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO नं दिला हा गंभीर इशारा!

“…तर राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत”

कोरोना लस घेतल्यानंतर परिणीती चोप्राची झाली ‘अशी’ अवस्था!

नेहा कक्कर गरोदर?; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More