“भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला”
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. अनेक वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर काही मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांना कार्यक्रमामध्ये भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.
श्रीक्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सामान्य वारकरी म्हणून आले असतील तर भेदाभेद भ्रम अमंगळ या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला. हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला, असा घणाघात अमोल मिटकरींनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे भान प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना असायला हवे होते, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनता कधीचं हे खपवुन घेणार नाही, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल तर आणि काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल तर संविधानिक पदाचा अपमान आहे. मोदीजी चुक दुरूस्त करा, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी,नाठाळाच्या काठी हाणू माथा, हा तुकोबारायांचा अभंग स्वत:वर उलटण्याची वेळ येऊ देऊ नये, असा टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘हा महाराष्ट्राचा अपमान,अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही हा अन्याय’; सुप्रिया सुळे संतापल्या
‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
“…म्हणून शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये”
पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी आहेत- देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; भारतात 10 लाख नोकऱ्या देणार
Comments are closed.