कोल्हापूर | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजप पुन्हा सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे रोड शो केला होता. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनचर्येबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोनच तास झोपतात. आता झोप लागू नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यानंतर ते 24 तास जागेच राहतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. झोपचं लागणार नाही. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा भाजपला जिंकायच्या आहेत, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूरात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून या निवडणुकीच्या तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजप जिंकण्यासाठीचं लढवेल. सत्यजित कदम यांच्या उमेदवारीची शिफारस दिल्लीकडे करण्यात आली आहे, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे. मात्र, चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली तर तिकीट देऊ, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील 60 देशांना लस पुरवली आहे. हिंदू जगाला किती उपयोगी ठरत आहे, हे आपण दाखवून दिलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यापूर्वी दोनवेळेस या देशात हिंदूंचे वर्चस्व झाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि आता नरेंद्र मोदींच्या काळात हिंदूंच वर्चस्व होतं, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“घाबरू नका, नरेंद्र मोदींनंतर भाजप टिकू शकणार नाही”
“मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी अन्…”
भारतात चौथी लाट येणार?, इस्त्रायलच्या नव्या व्हेरियंटने जगाचं टेन्शन वाढलं
“नारायण राणे आणि नितेश राणेंचा राजकीय इन्शुरन्स संपलाय, आता…”
“आम्ही पुन्हा 5 वर्ष सत्तेत राहू, भाजपच्या दंडात ताकद असेल तर…”
Comments are closed.