बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्ग वाढत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार वारंवार नागरिकांना लस घेण्याचं आवाहन करत आहे. तर काही नेते स्वतः लसीकरण करून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी या लसीकरणाचा दुुसरा डोस घेतला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुुसरा डोस घेतल्याची माहिती मोदी यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनावर मात करण्यासाठी उपलब्ध पर्यायापैकी लस हा एक पर्याय आहे. तुम्ही जर लसीकरणासाठी पात्र असाल तर लवकर लस घेऊन टाका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

1 मार्चला नरेंद्र मोदी यांनी कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला होता. स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस घेतल्याची माहिती त्यांनी दिली होती. दिल्लीच्या एम्स रुगणालयात पंतप्रधानांनी ही लस घेतली होती. या लसीकरण प्रकियेतील दोन्ही डोस पंतप्रधानांनी घेतले आहेत.

मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा डोस घेतला. कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डाॅक्टर्स ज्या वेगाने काम करत आहे, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरण करण्याचं आवाहन करतो. आपण सर्वांनी मिळून देशाला कोरोनामुक्त करुया, असं आवाहन पंतप्रधानांनी याआधी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ गोष्टींची वाढ; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू

…तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील- अनिल परब

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…

गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More