बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोनामुळे मागील वर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सर्वांना लस कधी येईल याची चिंता लागली होती. परंतू लस आल्यानंतर देखील लस घ्यावी की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. लसीच्या चाचण्या पुर्ण होऊनही लस प्रभावकारी आहे की नाही? असा प्रश्न आताही सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी स्वदेशी लस घेऊन घेऊन कोरानामुक्त भारत करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस घेतल्याची माहिती आहे. दिल्लीच्या एम्स रुगणालयात पंतप्रधानांनी ही लस घेतली आहे. या लसीकरण प्रकियेतील पहिला डोस पंतप्रधानांनी घेतला आहे. त्यांनी स्वतः याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डाॅक्टर्स ज्या वेगाने काम करत आहे, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरण करण्याचं आवाहन करतो. आपण सर्वांनी मिळुन देशाला कोरोनामुक्त करुया, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

दरम्यान, लसीची किंमत 250 रुपये असून 100 रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालये यापेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हेच शुल्क राहणार आहे, असं राष्ट्रीय आराेग्य मिशनच्या अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी स्पष्ट केलं. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण माेफत राहणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”

‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More