बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार असून नेमकी कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती PMO कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे. मोदी हे नेमकं कोणत्या विषयावर भाष्य करणार आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाहीये.

भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ 279 दिवसांत हा विक्रम घडला आहे. भारतात दहा महिन्यांपूर्वी 16 जानेवारी 2021 या दिवशी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतानं हा विक्रम पूर्ण केला आहे. सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेश झालं आहे.

दरम्यान, लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाष्य करुन वैद्यकीय यंत्रणांची पाठ थोपवण्याची शक्यता आहे. तसेच ते  जनतेचंही कौतुक करणार असल्याचं बोललं जात आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

‘नरेंद्र मोदींच्या भीतीच्या 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

लहान मुलांच्या लसीकरणानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More