बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहाटे देशाला संबोधित करणार!

नवी दिल्ली | उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजूही संवाद साधणार आहेत

उद्या 21 जून रोजी आपण 7 वा योग दिवस साजरा करणार आहोत. ‘योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे. उद्या सकाळी साडे सहा वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमाला मी संबोधित करणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन एका कार्यक्रम स्थळी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 7.45 पर्यंत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात योग करणार आहेत.

कोरोनामुळे यंदा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी संवाद साधल्यानंतर योगा केला जाणार आहे. लोकांनी घरीच राहून व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

गरज असेल तरच घराबाहेर पडा, नियमांचं पालन करा- अजित पवार

राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More